धाराशिव दि.(प्रतिनिधी):ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव शहरात एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 236 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्याची परंपरा जपली.
एसीएम ग्रुपकडून दरवर्षी ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीचे हे शिबिर सलग तेराव्या वर्षी यशस्वीरित्या पार पडले. शहरातील तरुणांनी उत्साहाने यात सहभाग नोंदवला असून, समाजातील रक्ताची गरज भागविण्यासाठी हे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
शिबिरास महाराष्ट्र राज्य वक्त मंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांनी विशेष भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “धार्मिक उत्सव साजरा करताना समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही एक आदर्श परंपरा आहे. एसीएम ग्रुपने गेल्या तेरा वर्षांपासून हे कार्य सातत्याने सुरू ठेवून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.”
यावेळी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, बाजार समिती सदस्य उमेश निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी, कादर खान, डॉ सायम रजवी, जावेद काझी, अबुल काझी, खायमुद्दीन मुजवार, शेख बाबा फैजोद्दीन आदी शहरातील मान्यवरांनीही रक्तदान शिबिराला भेट देऊन ग्रुपच्या सदस्यांचे प्रोत्साहन केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अझहर मुजवार, जफर शेख, सादिक पठाण, सादिक मुजवार, पोपट करवर, ईल्यास मुजवार, इम्रान मुजवार, शाफेज शेख, जमीर शेख, रियाज शेख, सय्यद खाजा, मजीद सय्यद, ओवेज शेख,असेम हुसेनी, मुन्ना नाईकवाडी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शहरातील विविध समाजघटकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतून शेकडो तरुण पुढे आले. आयोजकांनीही सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786













