• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

lokmadat news by lokmadat news
March 18, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
2
VIEWS


लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : भव्य स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी निर्गमित केला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे २ कोटी ८ लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ केल्याने नगरपरिषदेचीही आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण ₹ १.५० कोटी निधी मंजूरही करवून घेतला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ₹ २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम माफ करण्याची विनंती आपण शासनाकडे केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होऊन ९ जानेवारी २०२६ रोजी महसूल व वन विभागाने या जागेला ‘भोगवटादार वर्ग-२’ अंतर्गत महसूलमुक्त आणि मूल्यरहित तत्वानुसार मंजुरी देत जागा विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी धाराशिव शहरातील शीतकरण केंद्राच्या अखत्यारीतील असलेली १ एकर जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली आहे. सोमवारी तसा अधिकृत आदेश त्यांनी जारी केला आहे. त्याचबरोबर या जागेच्या चतुःसिमाही निश्चित करण्यात आल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या जागेवर भव्य स्मारक, आकर्षक उद्यान आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये केवळ अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळाच नसेल, तर त्यासोबतच सुसज्ज बाग बगीचा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आकर्षक उद्यानही विकसित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित अभ्यास केंद्र हे या स्मारकाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आणि सामाजिक लढ्याची स्मृती जिवंत ठेवणारे हे जिल्ह्यातील पहिले आणि मोठे स्मारक ठरणार आहे.

व्यापक लोकसहभागाची कृती समिती : आमदार पाटील

धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वप्रथम आपण.स्वतः एक लाख रुपयांचा व्यक्तिगत सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

SendShareTweet
Previous Post

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे केलेल्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी

Next Post

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विविध समिती प्रमुखांच्या निवडी

Related Posts

Uncategorized

“शालेय पोषण आहार”चा नळदुर्ग येथील दलाल मार्फत काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?

January 7, 2026
Uncategorized

धाराशिव उस्मानाबाद नगरपरिषदेकरिता प्रभाग क्रमांक 2, 7, 14, करिता निवडणुकीचा नवीन कार्यक्रम जाहीर

November 30, 2025
Uncategorized

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकडो अर्ज दाखल आज छाननी

November 18, 2025
Uncategorized


श्री साई जनविकास आयटीआय मध्ये  आयुध पूजन कार्यक्रम  उत्साहात संपन्न

September 30, 2025
Uncategorized

पूरग्रस्त धाराशिव जिल्हा आक्रंदत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘गार डोंगराची हवा’वर ठेका — नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी!

September 26, 2025
Uncategorized

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

September 22, 2025
Next Post

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विविध समिती प्रमुखांच्या निवडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कामगारच ठरला दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४२  हजारांच्या मुद्देमालासह  २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

धाराशिवात डीजेवर कडक बंदी पोलिसांचा मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ!

April 1, 2026

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

April 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT