धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) – येथील धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्या मंदिरात क्रांती दिन साजरा करण्यात आला.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भास्करराव नायगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिलीप गणेश, सुरेश धारूरकर, ऍड.सुग्रीव नेरे, अरुण माडेकर, बालाजी जाधव, धनंजय माळी आदी उपस्थित होते. यावेळी नायगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक कसरतीसाठी मल्लखांब भेट दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी क्रांती दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पंडित जाधव यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत माळी यांनी व आभार रमण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










