भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
“पैशाच्या मोबदल्यात केला होता हल्ला”
वाशी दि.१८(प्रतिनिधी):दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे ईट शिवारातील ईट-जातेगाव रोडवरील किनारा हॉटेल जवळ पाटोदा तालुक्यातील श्रीकृष्ण अर्जुन बांगर (वय 39, व्यवसाय नोकरी) व त्यांचे सहकारी रविंद्र राख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बोलेरो गाडीतून प्रवास करत असताना अनोळखी चार इसमांनी त्यांची गाडी थांबवून मारहाण करून गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 290/2025 भा. न्याय संहिता कलम 109 (1), 115 (2), 118 (1), 351 (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर अपर, पोलीस अधीक्षक शफकत सामना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सोपवला होता. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाला संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार येरमाळा उड्डाणपुलाखालून संशयित सलमान पठाण (रा. भूम) व रितेश अंधारे (रा. हाडोंगरी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी हल्ल्याची कबुली देत गुन्हा पैशाच्या मोबदल्यात केल्याचे उघड केले. तसेच अन्य साथीदारांची माहिती देखील दिली. सदर आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या यशस्वी कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर तसेच चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तात्काळ कारवाईमुळे जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा उघडकीस येऊन आरोपींना ताब्यात घेतल्याबद्दल पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












