• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

टुडे समाचार संपादक हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन

lokmadat news by lokmadat news
September 20, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
2.3k
VIEWS

पत्रकार हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – टुडे समाचारचे संपादक हुकमत हमीद मुलाणी रा. कोंड (वय ४७ वर्षे) यांचे दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोंड येथील कब्रस्तानमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकार, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे, आई, वडील, बहिण व भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांनी अतिशय खडतर प्रवासातून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. प्रारंभी त्यांनी दैनिक जनप्रवास, गावकरी, सकाळ आदी दैनिकांत ग्रामीण भागातील व्यथा मांडून त्या समस्या सोडविण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यामुळे गरिबांना न्याय मिळण्यासाठी मोलाची मदत मिळाली. प्रिंट पत्रकारितेबरोबरच डिजिटल माध्यमात टुडे समाचारच्या माध्यमातून…दूध का दूध, पानी का पानी…मी हुकूमत मुलाणी…असे म्हणत झिरो ग्राउंड रिपोर्ट म्हणजे संबंधित घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजू जाणून घेऊन त्या लोकांना दाखवून हृदयस्पर्शी घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत होते. त्या घटनेचे वास्तव व बातमीच्या मागची बातमी जगासमोर उजेडात आणून खरी पत्रकरीता काय असते ? हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी अल्पावधीतच वेगवेगळ्या विषयाला हात घालून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे ते अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या गळ्यातील  पत्रकाररुपी चालते बोलते डिजिटल पत्रकारितेचे ताईत बनले. दि.२० सप्टेंबर रोजी ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बातमीसाठी जाण्याची तयारी करीत असतानाच त्यांना अस्वस्थ होऊन घाम येऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत दुर्दैवाने मालवली. त्यांनी ग्रामीण भागातील बातमीदारी काय असते ? हे शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनाच दाखवून दिले. विशेष म्हणजे ते बातमीदारी करताना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता अधिक निडरपणे, दक्षपणे व तेवढ्याच ताकदीने मांडणी करीत होते. त्यामुळे उद्या कोणत्या विषयावर ते बातमी देणार आहेत ? याची उत्सुकता अनेकांना लागलेली असायची. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, निर्भिडवाणी व कोणताही मुलाहिजा न ठेवता मांडण्याची कला त्यांच्या बातमीत ठासून भरलेली असल्यामुळे अनेकजणांना भुरळ घातली होती. त्यांची पत्रकारिता फुलत असतानाच निसर्गाचा हा दुर्दैवी आघात सर्व पत्रकार आणि त्यांच्या पत्रकारितेला हुरहूरी लावणार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने हरहुन्नरी पत्रकार विशेषतः ग्रामीण भागातून ज्या प्रकारे मांडणी करणे आवश्यक होते, अगदी तशीच मांडणी करणारा पत्रकार अचानकपणे कायमचाच निघून गेला आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: उस्मानाबादकोंडजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवझिरो ग्राउंड रिपोर्टधाराशिवनिधनपत्रकारमहाराष्ट्रमृत्यूसंपादकहुकमत मुलानि
SendShareTweet
Previous Post

टुडे समाचारचे संपादक हुकूमत मुलानी यांचे हृदयविकाराने निधन.”ग्राउंड रिपोर्टिंगची धार गमावली”

Next Post

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधव अडचणीत

Related Posts

सामाजिक

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026
सामाजिक

तृतीय पंथी यांच्यासाठी घरकुल बांधून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

January 14, 2026
सामाजिक

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जलाभिषेकाचा मान

January 14, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीला मंजुरी

January 13, 2026
सामाजिक

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स कार्यालयाचे उद्घाटन

January 5, 2026
सामाजिक

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजू वधु – वरांच्या पालकांनी लाभ घ्यावा – विश्वासअप्पा शिंदे

January 2, 2026
Next Post

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधव अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

January 16, 2026

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026

अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

January 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT