• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

lokmadat news by lokmadat news
September 22, 2025
in Uncategorized, महाराष्ट्र
0
0
SHARES
14
VIEWS

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
तुळजापूर बसस्थानकांना नवे नाव – श्री तुळजाभवानी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ नामकरण

धाराशिव.दि.२२ सप्टेंबर (प्रतिनिधी) शारदिय नवरात्र उत्सवाचा मंगलारंभ आज देशभर होत असताना, तुळजापूर नगरीत देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटणार आहे.घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लाखो भक्तगण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने केलेली भाविकांसाठीची सोय ही यंदाच्या नवरात्रात खास आकर्षण ठरत आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये नव्या ५० बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार असून तुळजापुरातील नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत दोन्ही बसस्थानकाचे नामकरण अनुक्रमे श्री. तुळजाभवानी बसस्थानक व छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक असे करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे  झाले.यावेळी पोलीस अधीक्षक रितु खोखर,एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के व विभाग नियंत्रक विनोद भालेराव हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री तथा पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी यांच्या श्रमाला उत्साहाची नवी उर्जा मिळावी म्हणून यंदा ५० नव्या बसेसची भर घालण्यात आली आहे.या बसेस खास भक्तांच्या प्रवासासाठी तुळजापूर मार्गावर धावणार असून,भाविकांना सुखरूप व सोयीस्कर प्रवासाची हमी देणार आहेत.

इतकेच नव्हे तर,दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल ११०० बससेवा सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी ही सोय म्हणजे सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

तुळजापूरकरांची अनेक दिवसांची मागणीही यंदा पूर्ण होत आहे.आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर तुळजापूरातील दोन बसस्थानकांचे नामकरण करण्यात आले.मुख्य बसस्थानकाला “श्री तुळजाभवानी बसस्थानक तुळजापूर” हे नाव देण्यात आले असून, दुसऱ्या महत्त्वाच्या बसस्थानकाला “छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक तुळजापूर” असे गौरवपूर्ण नाव देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली.

पालकमंत्री प्रताप सरनाईक या प्रसंगी बोलताना म्हणाले की,या नामकरणामुळे भक्तिभाव, ऐतिहासिक स्मरण व सांस्कृतिक अभिमान यांचा संगम साधला गेला आहे.आई तुळजाभवानीच्या चरणी नव्या नावाचा हा मंगल प्रसाद अर्पण झाल्याने स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          एसटी महामंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी उचललेले हे पाऊल हे फक्त सोयीपुरते नाही,तर ती आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठीची नवी वाहतूक-यज्ञसेवा ठरणार आहे.

“आई तुळजाभवानीचा आशीर्वाद एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर व भाविक प्रवाशांवर सदैव राहो,”अशी कृतज्ञ भावना व्यक्त परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनवरात्र उत्सव 2025 नवरात्र उत्सव दसरा शिलंगण आई तुळजाभवानी तुळजाभवानी माता तुळजाभवानी तुळजापूर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव नगरपरिषद तुळजापूर पर्यटन पर्यटक भाविक पालखी दिंडी पाईवारीशारदीय नवरात्र महोत्सव
SendShareTweet
Previous Post

श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा सन्मान – नवरात्रात नवदुर्गा गौर उपक्रमाचा सहावा वर्षारंभ

Next Post

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT