• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

lokmadat news by lokmadat news
September 23, 2025
in क्राईम
0
0
SHARES
829
VIEWS

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई

धाराशिव दि.२३(प्रतिनिधी):धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील एका बंद पडक्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईतून तिरट नावाचे जुगार साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असे एकूण ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उप विभागीय कार्यालयातील पथक पेट्रोलिंग करत असताना तेरणा टी-पॉईंट परिसरात पोहोचले. त्यावेळी पो. ह. काझी (पो.ठाणे आनंदनगर) यांच्या सह गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी कार्यालयाच्या पाठीमागील एका बंद पडलेल्या इमारतीत काही इसम जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आयान अली अहमद अली कुरेशी (२२, रा. रमाई नगर), प्रतीक परमेश्वर जाधव (२४, रा. शिवछत्रपती नगर), प्रशांत महादेव कांबळे (२९, रा. दत्तनगर, येडशी रोड), अविनाश विनायक चव्हाण (२८, रा. शिंगोली तांडा), विशाल सिद्धार्थ सातदिवे (२६, रा. शालिमार हॉटेल मागे), इस्माईल अलीम शेख (२७, रा. शालिमार कॉलनी), अजीम सलीम शेख (२६, रा. शालिमार कॉलनी, एमआयडीसी रोड), एजाज शौकत तांबोळी (२२, रा. शालिमार कॉलनी, एमआयडीसी रोड) असे आठ जण रंगेहात पकडले गेले. त्यांच्या ताब्यातून तिरट नावाचे जुगार साहित्य, रोख रक्कम व मोबाईल जप्त करून पंचनामा करण्यात आला.
पो.हे.कॉ. हुसेन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली, पो. हे.कॉ. हुसेन सय्यद, पो. ना. पाटील, पो. कॉ. गरड, सय्यद, ठाकूर तसेच चा.ह. लाटे यांच्या पथकाने केली.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: crimedharashivdharashiv lokmadat newsdharashiv osmanabaddharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदअवैध धंदेआरोपीउपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवउस्मानाबादऑनलाइन जुगारक्राईमजुगारीधाराशिवपोलीसपोलीस अधीक्षकस्थानिक गुन्हे शाखा धाराशिव
SendShareTweet
Previous Post

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Next Post

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT