धाराशिव शहरातील अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) – शहरातील चौका चौकात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती घोषणा फलक व होर्डिंग तसेच पोस्टर्स लावून चौकाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालक व वाटसरुंच्या नजरा त्याकडे जातात. त्यादरम्यान अनेक अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे ते अनधिकृत जाहिरातीचे फलक होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी युवा शिवसेना (ठाकरे) च्या वतीने एका निवेदनाद्वारे दि.२३ सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होडिंग व पोस्टर्स संदर्भात मे. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मे. सुस्वराज्य फौंडेशन, सातारा आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या याचिकेवरील सुनावणीमध्ये मे. उच्च न्यायालयाने दि. ३१ जानेवारी, २०१७ रोजी विस्तृत निकालात अनाधिकृत जाहिरातीचे फलक होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी असे स्पष्ट नमूद केले आहे. परंतू त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळे उच्च न्यायालयाने दि.१९ डिसेंबर, २०२४ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये नाराजी व्यक्त करीत कारवाई करावीच असे सत्तादेश दिले आहेत. त्या आदेशाचे धाराशिव नगरपालिका अंमलबजावणी करत नाही. कारण
नगर पालिका क्षेत्रातील रस्त्यावर अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर तात्काळ हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धाराभिव शहरातील बेकायदेशीर होर्डिंगचा तात्काळ हटवावेत अन्यथा युवा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावर युवा शिवसेनेचे शहराध्यक्ष अभिराम कदम, माजी नगरसेवक राणा बनसोडे व प्रवीण केसकर यांच्यासह आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












