धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरती
धाराशिव – नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 23) सायंकाळी ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवीची नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
मंदिर समितीच्या वतीने सचिव बाळासाहेब यादव यांच्या हस्ते मुख्याधिकारी अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी दीपक तावडे, बाळासाहेब साळुंके, मंदिर समितीचे सदस्य शैलेश कदम, संकेत साळुंके, बालाजी शिंदे, प्रमोद डोके यांच्यासह शहरातील देविभक्त उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













