शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही..
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली..
यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या..
अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.. शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालंय, घराचं छप्पर पुराच्या लाटेत गडप झालं, संसार उद्ध्वस्त झाला, लेकरांच्या डोळ्यातलं भविष्य वाहून गेलंय, आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर ओसंडतोय ही करुण कहाणी प्रत्येक गावात आहे..
असं असतानाही सरकार अजून पंचनाम्याची वाट का पाहतंय? डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का? सरकार सरसकट मदत जाहीर करण्यात का मागेपुढे पाहतंय? असा सवाल उद्धव साहेबांनी सरकारला केला..
आपल्या लढ्याच्या प्रत्येक पावलावर शिवसेना खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभी आहे असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला..
यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, मा. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, मा. खा. चंद्रकांत खैरे, आ कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, मा. आ. दयानंद गायकवाड आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












