शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू असून, आज गुरुवार (२५ सप्टेंबर) रोजी देवींची नित्योपचार पूजा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली.शारदीय नवरात्रीतील आजची चौथी माळ असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवींचे अभिषेक करण्यात आले. सकाळी देवीची आरती करण्यात आली.
दरम्यान, काल बुधवार २४ सप्टेंबर रोजी देवींची गरुड या वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली.या छबिना मिरवणुकीसाठी तुळजापूर व परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.छबिना मिरवणुकीदरम्यान वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसरात्र भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.दर्शन व पूजेकरिता मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असून,सुरक्षा यंत्रणांकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देवीच्या नवरात्र महोत्सवात येत्या दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी नेमने आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा 8390088786












