• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

lokmadat news by lokmadat news
August 12, 2025
in राजकारण
0
0
SHARES
33
VIEWS

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य घेतले जात आहे. आता महाराष्ट्र बदलत आहे. तो थांबणार नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्ती कामाचे भूमिपूजन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे तेरणा उपसा सिंचन योजनेचे शिल्पकार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामुळेच कृष्णा खोर्‍यातील हक्काचे पाणी मराठवाड्यासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ज्या तळमळीने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अविरत काम केले, तीच तडफ अभ्यासू, कर्तबगार आणि धडाडीचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या ठायी आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच अशक्यप्राय असलेली निम्न तेरणा उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. आम जनतेच्या अडचणी दूर करणे हे आपल्या महायुती सरकारचे काम आहे. पुढच्या ऑगस्टपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेकरिता बंद पाईपलाईन मंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली. निधीची तरतूद आवश्यकतेप्रमाणे करून वर्षभरात हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. करजखेडा येथील पंपगृहात फ्लोटींग सेालार व्यवस्था करण्याची मागणीही यावेळी आमदार पाटील यांनी केली. जिल्ह्यात ३३ मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही. तसेच कॅनॉल सिमेंट लाईन साठीही निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार श्री. प्रवीण स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन श्री. अरविंद गोरे, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री. सुरेशभाऊ देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, मजूर फेडरेशन चेअरमन सतीश दंडनाईक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: उस्मानाबादजलसंपदाधाराशिवपाणीमराठवाडाराजकीय
SendShareTweet
Previous Post

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा

Next Post

एकदिवशीय पत्रकार कार्यशाळा संपन्न जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

एकदिवशीय पत्रकार कार्यशाळा संपन्न जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT