• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईल – आ. राणाजगजितसिंह पाटील

lokmadat news by lokmadat news
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
7
VIEWS


जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईल

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अनेकांच्या शेतजमीन खरवडून गेली आहे.खरीप हातातून गेला आहे.अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बॅक सक्षम व्हायला हवी. धाराशिव जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी राज्य सहकारी बँकेला संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकरी बांधवांना सुरळीत कर्जपुरवठा सुरू होऊ शकेल. नागपूरप्रमाणे धाराशिव जिल्हा बँकेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे पत्रही मुख्यमंत्र्‍यांना देण्यात आले आहे. 

सुस्थितीत असलेल्या धाराशिव जिल्हा बँकेचे कंबरडे होमट्रेड रोखे घोटाळ्यामुळे मोडले. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँक बंद पडली. त्यावेळेपासूनच शेतकऱ्यांचा कणा असलेल्या जिल्हा बँकेला उतरती कळा लागली. ४४० कोटी रुपयांच्या ठेवी देणारे तब्बल सहा लाख ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले. सन २००२ पासून म्हणजेच मागील २३ वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा चक्क बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारीच्या जोखडातून जावे लागत आहे.

नागपूर जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेकडून संस्थात्मक प्रशासकाची नेमणूक केली आहे. धाराशिव जिल्हा बँकेवरही अशाच प्रकारे संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेची नेमणूक झाल्यास बँकेला त्याचे मोठे फायदे होणार आहेत. राज्य सहकारी बँकेची सर्व साधने, संसाधने, तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारीवर्ग, निधी आणि मालमत्तेचा वापर जिल्हा बँकेला सक्षम करण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून धाराशिव जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेसोबत मिळून कर्जवितरणासह विविध उपक्रम राबवता येणार आहेत. असे झाल्यास धाराशिव जिल्हा बँकेला पूर्ववैभव प्राप्त होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

धाराशिव जिल्हा बँकेचा (आधीची उस्मानाबाद जिल्हा बँक) राज्यात दबदबा होता. त्यावेळी ही बँक आर्थिकद़ष्ट्या संपन्न होती. मात्र होमट्रेड रोखे घोटाळा आणि जाणीवपूर्वक मनमानी पद्धतीने केलेल्या कर्जवाटपामुळे बँक अडचणीत अडकली. या बँकेतून कर्जपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचीही कोंडी झाली. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेची नेमणूक करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कर्जाच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाचाही सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करून राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यास ही समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे ही महत्वाची मागणी केली आहे. या अनुषंगाने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी देखील यशस्वी चर्चा केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
SendShareTweet
Previous Post

आर. पी. औषधनिर्माण महाविद्यालयात ‘जागतिक औषध निर्माता दिन’ आणि ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

Next Post

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT