स्त्री रुग्णालय धाराशिव येथे पोषणविषयक प्रदर्शनी व ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहाराविषयी प्रदर्शनी व ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ उपक्रमांतर्गत रुग्णांना फळांचे वाटप
धाराशिव, दि. 2 (प्रतिनिधी) :दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “स्वस्थ नारी सशक्त परिवार व राष्ट्रीय सेवा पोषण महाराष्ट्र 2025” या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व अंतर्गत स्त्री रुग्णालय धाराशिव येथे आहाराविषयी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनीत गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व बालकांचा संतुलित आहार या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना संतुलित आहाराचे महत्त्व, पोषणतत्वांची गरज तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचे फायदे याची माहिती तज्ञांनी दिली.
या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, वैद्यकीय महाविद्यालय आधी सेविका श्रीमती सुमित्रा गोरे, स्त्री रुग्णालय औद्योगिक कर्मचारी श्रीमती ढोणे व रिबेका भंडारी, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आहार तज्ञ श्रीमती कल्पना दौंडे, श्रीमती ऐश्वर्या ढेरे आणि स्त्री रुग्णालयाच्या आहार तज्ञ श्रीमती प्रीती रुपनर उपस्थित होत्या.
याशिवाय सर्व विभागातील कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रमांतर्गत रुग्णालयातील अंतर्गत रुग्णांना फळांची टोपली वाटप करून रुग्णांमध्ये आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात डॉक्टर, कर्मचारी यांच्यासोबत उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक सहभागी होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













