• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

lokmadat news by lokmadat news
October 2, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
16
VIEWS

“आपली एसटी” ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार .. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई :  प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी “आपली एसटी” या नावाने नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल तथापि १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल. आपली एसटी एक मराठमोळे नाव. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( MSRTC ) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं असून आता या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. अर्थात , या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि. या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या “आपली एसटी (Aapli ST) ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प्रवासी माहिती केंद्राद्वारे (Passenger Information System) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA ) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल – टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील. ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स) उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन यांच्यांदरम्यान चालणान्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे . याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे . सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे . भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील . पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत . तसेच लवकरच एसटीचे (MSRTC) सध्या असलेल्या … तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे , ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल . एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह , पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून , आपली एसटी ( Aapli ST ) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे . तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे . चौकट सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल . तथापि , आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.

Tags: एस टी महामंडळधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमुंबई
SendShareTweet
Previous Post

स्त्री रुग्णालय धाराशिव येथे पोषणविषयक प्रदर्शनी व ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात

Next Post

श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT