• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी राखीव

lokmadat news by lokmadat news
November 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
2.4k
VIEWS

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने चकनाचूर, पण ….हे आहेत प्रमुख नवे दावेदार!

धाराशिव दि. ०६ ऑक्टोबर २०२५  (अमजद सय्यद) :धाराशिव नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्व शहरवासीयांचे डोळे लागले असून राजकीय वर्तुळात याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील कार्यकाळात नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित होते. त्यावेळी शिवसेना पक्षाचे मकरंदराजे निंबाळकर हे बहुमताने निवडून आले होते. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर तीन ते चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासकिय कारभार चालू होता.
मात्र आज मुंबई मंत्रालयात झालेल्या सोडतीत धाराशिव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष होईल या अपेक्षेने तयारी करणाऱ्या तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केलेल्या नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. तरीदेखील आता ओबीसी महिला आरक्षणामुळे नवे समीकरण तयार झाले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट चुरस होण्याचे संकेत दिसत आहेत.

भाजपकडून सौ. नेहा राहुल काकडे प्रबळ दावेदार!

महायुतीकडून, विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून या पदासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी सौ. नेहा राहुल काकडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याआधी राहुल काकडे यांच्या मातोश्री सुनंदा हरिभाऊ काकडे नगरसेवक राहून प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांतूनही नेहा काकडे यांना जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे संकेत आहेत. शेवटी या उमेदवारीवर भाजप नेते व आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा निर्णय अंतिम ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील रस्सीखेच!

महाविकास आघाडीत मात्र काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार हे निश्चित झाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून दोन टर्म नगरसेवक राहिलेले, माजी नगरसेवक तथा गटनेते आणि विद्यमान शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी सौ. संगीता सोमनाथ गुरव या प्रबळ दावेदार आहेत. खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि आमदार तसेच जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून समजले जात असून त्यांचा गुरव यांना पूर्ण पाठबळ असल्याचे सांगितले जाते.

काँग्रेस पक्षाकडून दोघे सक्षम दावेदार!

काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे हे काँग्रेस पक्षाकडे जागा सोडून घेऊन दावेदारी दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांच्या पत्नी सौ. राधिका धनंजय राऊत यांचे नावही चर्चेत आहे. धनंजय राऊत हे पक्षनिष्ठ, कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जपणारे आणि संघटनेत सक्रिय भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ओबीसी समाजासाठी सतत भरीव काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींची दावेदारी अधिक सक्षम आणि जनतेत प्रभावी मानली जात आहे.
तर काँग्रेस पक्षाचे दुसरे दावेदार हे अझर पठाण काँग्रेसचे उदयोन्मुख युवा नेते असून सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय आहेत. मुस्लिम समाजासह इतर घटकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडीअडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारे, प्रामाणिक व कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सौ. सबा अझर पठाण यांची दावेदारी उभी राहणे ही त्यांच्यावरील जनतेच्या विश्वासाची व समाजातील आपुलकीची साक्ष असल्याचे बोलले जात आहे.
समीकरणे गुंतागुंतीची, निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत  या सर्व दावेदारांमध्ये ऐनवेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे ज्यांच्या गळ्यात माळ टाकतील तेच शेवटी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

धाराशिव शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी आता ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाल्याने सर्व समीकरणे बदलली आहेत. भाजप, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून जोरदार दावेदार उभे राहिले असून कोणावर शेवटी पक्षश्रेष्ठींचा विश्वास बसतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
“शेवटी धाराशिव चा नगराध्यक्ष कोण?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी येणाऱ्या निवडणुकीत राजकीय रंगत आणि थेट लढत पाहायला मिळणार यात शंका नाही.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsनगर परिषद मुख्याधिकारीनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५नगराध्यक्ष आरक्षण सोडतमुंबई महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग
SendShareTweet
Previous Post

हे संकट अभूतपूर्व.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

Next Post

तुळजापूरमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक व बंदोबस्ताची पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजाभवानी मंदिर परिसरासह वाहतूक व्यवस्थेची पाहणी

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

तुळजापूरमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक व बंदोबस्ताची पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजाभवानी मंदिर परिसरासह वाहतूक व्यवस्थेची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT