सोशल मीडियावरील भक्कम पकडीमुळे अभिजीत पतंगे यांची भाजप धाराशिव जिल्हा समन्वयकपदी निवड
धाराशिव दि. ०८ (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियामध्ये सातत्याने सक्रिय राहून पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे व विरोधकांच्या प्रत्येक आव्हानाला तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देणारे अभिजीत पतंगे यांची भाजप धाराशिव जिल्हा सोशल मीडिया समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पतंगे यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. सोशल मीडिया जिल्हा संयोजक सागर दंडनाईक यांनी त्यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले.
अभिजीत पतंगे हे सोशल मीडियावर 24 तास कार्यरत राहून पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे, युवा पिढीमध्ये पक्षाची भक्कम बाजू सादर करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुशल नेतृत्वशैलीमुळे आणि कार्यशैलीमुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
पतंगे यांच्या निवडीबद्दल भाजप शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अमितभैया शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संपादक अमजद सय्यद 8390088786












