धाराशिव नगरपरिषद निवडणूक.. प्रभाग क्रमांक 20 मध्ये अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षण – विलास (बापू) लोंढे यांच्या सोशल मीडियावर विजयाच्या चर्चा जोरात!
धाराशिव दि. 08 (अमजद सय्यद) :धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव येथे नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. उपविभागीय अधिकारी श्री.ओंकार देशमुख व नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला. शहरातील विविध प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नाराजी अशी भावना व्यक्त होताना दिसली.
मात्र प्रभाग क्रमांक 20 मध्ये आरक्षण हे अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असल्याचे पहावयास मिळत. या प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या जोरावर ओळख निर्माण केलेले, भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे खंदे समर्थक व गोरगरिबांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध असलेले युवा नेतृत्व विलास उर्फ बापू लोंढे यांचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या तसेच कसलाही राजकीय वारसा नसलेला नेता म्हणून विलास लोंढे यांची लोकमान्यता प्रचंड असल्याची दिसत आहे. नागरिकांच्या लहानसहान अडचणींपासून ते शिक्षण, आरोग्य, लग्नसमारंभ, पोलिस ठाण्याच्या तक्रारींपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते स्वतः धावून जातात. “24 तास उपलब्ध असलेले नेते” म्हणून त्यांची खास ओळख निर्माण झाली आहे. याचमुळे बांधकाम मजूर, धुणी भांडी करणारे मजूर तसेच सामान्य कष्टकरी नागरिक यांनी प्रभागात शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही “विलास लोंढे – भावी नगरसेवक” अशा पोस्ट मोठ्या प्रमाणावर झळकताना दिसत आहेत.
आरक्षण जाहीर होताच नागरिकांनी ही देवाची कृपा असल्याची भावना व्यक्त केली. “आजपर्यंत लोंढे यांनी केलेले सामाजिक कार्यच त्यांच्या विजयाची पोथी आहे,” असे मत स्थानिक नागरिकांनी ‘लोकमदत न्यूज’शी बोलताना मांडले.
भाजपाच्या संघटनेतही विलास लोंढे हे एक प्रामाणिक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आमदार जगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते नितीन काळे,शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, कष्टकरी नागरिकांच्या अडचणी सोडवणे अशा विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागात लोंढे यांच्या विजयाच्या चर्चांना सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण आहे. नागरिक म्हणतात – “लोंढे हे केवळ उमेदवार नाहीत तर आमच्या प्रभागाचे खरे आधारस्तंभ आहेत. यावेळी त्यांना संधी मिळालीच पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.”
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












