शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी तानाजी जाधवर
धाराशिव दि. ०९ (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचाराने प्रेरित होऊन तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना सह संपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी तानाजी विश्वनाथ जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबतचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी तानाजी जाधवर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार शिवसेनेच्या वाढीसाठी व सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेनेशी एकनिष्ठ राहून पक्षाची भक्कम बाजू मांडणारे म्हणून तानाजी जाधवर यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी तानाजी जाधवर निश्चितच प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












