राष्ट्रवादीच्या वतीने काळे आकाश कंदीलासह काळे फुगे फोडून दिवाळी साजरी
सरकारच्या तोकड्या मदतीविरोधात राष्टÑवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
धाराशिव : (प्रतिनिधी): शेतकºयांचे शेती कर्ज माफी द्यावी तसेच हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्टÑवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ वा. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे आकाश कंदील काळे फुगे फोडून आंदोलन करण्यात आले.
याबाबत सरकारने मदतीचा आकडा सांगितला आहे. मात्र प्रत्यक्षात होणाºया मदतीमध्ये तफावत असल्याने शेतकºयांची फसवूण झालेली आहे. शेतकºयांची फसवणूक न करता त्यांना तातडीने शेती कर्ज माफ करावे. तसेच हेक्टरी ५० हजाराचे अनुदान द्यावे, विना अटी-शर्थीने संपूर्ण पिकविमा मिळावा, सोसाबीनची शासकीय खरेदी ताबडतोब करुन भावांतर योजना लागू करावी, अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीबाबत व विहीरीतील गाळ काढण्याच्या किचकट अटी रद्द कराव्यात. शेतकºयांच्या या व इतर मागण्यांसाठी शेतकºयांच्या व्यथा शासन दरबारी पोहंचवाव्यात यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठम माने, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, लोहारा तालुकाध्यक्ष नरदेव कदम,डॉ.मोहन बाबरे, अॅड. प्रविण शिंदे, इकबाल पटेल, अनिल जाधव, भारत शिंदे, भगवंतसिंग बायस, गुंडाप्पा गाजरे, लिंबराज लोकरे, गौतम क्षिरसागर, मोहम्मद शेख, गोपाळ जाधव, उध्दव शेळके, दिनेश खुने, सतीश माने, चंद्रकांत पाटील, संदीप जाधव, गणेश गडकर, ज्ञानदेव मडके, विठ्ठल कोळगे, श्री. भांडारकर, किशोर आव्हाड, बबन काळदाते, प्रदिप काळदाते, वसंत कुंभकर्ण, शिवाजी साळुंके, नवनाथ साळुंके, रामहारी साळुंके, सलमान पठाण, वलीभाई शेख, साजिद शेख, वीरखान पठाण, नवनाथ ढवणे, मोहन गायकवाड, दत्ता कोल्हापुरे, विलास वीर, साहेबराव गायकवाड, सिराज शेख, श्रीधर धाबेकर, उत्रेश्वर धाबेकर, शुभम वडगणे, नवनाथ क्षिरसागर यांच्यासह राष्टÑवादीचे पदाधिकारी, शेतकरी, युवक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.













