शमशोद्दीन शेख यांची शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल जावेद शेख यांनी सत्कार, दिल्या शुभेच्छा
धाराशिव (प्रतिनिधी) शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी शमशोद्दीन (भाई) शेख यांची निवड करण्यात आली असून या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्ताने शिवसेना धाराशिव अल्पसंख्याक युवा जिल्हाप्रमुख जावेद भाई शेख यांनी शमशोद्दीन भाई यांचा पुष्पहार घालून व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “शमशोद्दीन भाई यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना सहकार सेनेला नवचैतन्य लाभेल. त्यांनी मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात पक्षाची विचारधारा पोहोचवावी, अशी अपेक्षा आहे.”
शमशोद्दीन भाई शेख यांनीही विश्वास व्यक्त केला की, मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात शिवसेना सहकार सेनेचे बळ वाढविण्यासाठी ते तत्परतेने काम करत राहीन यावेळी त्यांनी जावेद भाई शेख व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












