धाराशिवमध्ये ‘हंगे स्टाईल्स’ उद्योगाचा शुभारंभ ३० ऑक्टोबरला – लताताई अविनाश हंगे यांच्या हस्ते उद्घाटन
धाराशिव, दि. २८ (प्रतिनिधी) – आधुनिक पद्धतीच्या व आकर्षक स्टाईल ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘हंगे स्टाईल्स’ या नव्या उद्योगाचा शुभारंभ धाराशिव शहरात होत आहे. या उद्योगाचे उद्घाटन दि. ३० ऑक्टोबर रोजी लताताई अविनाश हंगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
धाराशिव येथील एमआयडीसी परिसरातील जुन्या किंग हॉटेलजवळ हा उद्योग सुरू होत असून, उद्घाटन कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार विक्रम काळे, तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, प्रगती बँकेचे चेअरमन प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील, क्रेडाई अध्यक्ष पी. के. मुंडे, मॅग्मो राज्याध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स असोसिएशनचे श्यामकांत नाईकनवरे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर, रोटरी क्लब अध्यक्ष रणजीत रणदिवे, व्यापारी महासंघ अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बबलू शेख, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन तावडे, काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता पार पडणार असून, धाराशिव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन उद्योगास शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन प्रतीक हंगे, रेवा हंगे, अरुणिमा, श्रीशा, पुष्पराज हंगे, वैष्णवी हंगे, अनंत हंगे, अनिता शिंदे आणि अर्चना पाटील यांनी केले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













