माणुसकी, सेवा आणि समर्पण यांचं प्रतीक — कोरोना काळात मानवतेचा दीप पेटवणारा धाडसी युवक प्रशांत बापू साळुंके नगरपालिकेतून जनसेवेसाठी सज्ज
धाराशिव – धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 04 हा यंदा सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागात जनतेचा विश्वास संपादन केलेले नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाजसेवक प्रशांत उर्फ बापू साळुंके. “80% समाजकारण आणि 20% राजकारण” या विचारधारेनुसार काम करत त्यांनी गेल्या 22 वर्षांत जनतेच्या सेवेला स्वतःला वाहून घेतले आहे. कोरोना काळात जेव्हा लोक भयभीत झाले होते तेव्हा बापूंनी गरजू रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे, ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था करणे, भाजीपाला व वाफेच्या मशीन पोचवणे अशा अनेक कार्यातून मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवला. प्रभागातील मुस्लिमबहुल भागात 35-40 वर्षे थांबलेली विकासकामे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पूर्ण करून दाखवली. रस्ते, नाले, वीज केबल टाकणे, पावसाच्या पाण्याचा निचरा या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. धर्म आणि मानवतेचा सेतू बांधत ईदच्या वेळी इफ्तार पार्टी तसेच दिवाळीत हिंदू-मुस्लिम फराळ सोहळे आयोजित केले. लसीकरण मोहीमा, आरोग्य शिबिरे, रेशन कार्ड, आधार, निराधारांना शासकीय मदत अशा शेकडो उपक्रमांतून जनतेच्या घरपोच सेवा दिल्या. दरवर्षी “संकल्प” रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. नवरात्र उत्सव, हिंदू संस्कृती संवर्धन, महिलांसाठी फिजिओथेरपी शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी धाराशिवमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रशासन आणि राजकारण यांची जोड घालून अधिकारी वर्गासमोर जनतेचा हक्क मिळवून देणारा ठाम लढवय्या चेहरा म्हणजे प्रशांत बापू साळुंके. प्रामाणिकपणा, धैर्य आणि जनसेवेची निष्ठा यांच्या बळावर या वेळेस प्रभाग 04 मधील निवडणूक एकतर्फी बापूंच्या बाजूने झुकलेली असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. धाराशिवसाठी एक प्रामाणिक, जनतेशी निगडीत, कार्यक्षम नेतृत्व उभं राहत आहे — प्रशांत बापू साळुंके!












