धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी):आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली. बैठकीत आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी असे सर्वानुमते ठरले.
धाराशिव शहरात सर्वधर्म समभाव जपून विकासाचे काम करण्यासाठी महाविकास आघाडी करावी असे सर्वांनी आवाहन केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, गटनेते सिद्धार्थ बनसोडे, डी.सी.सी.बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते सदर उस्मान कुरेशी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मुहीब शेख, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, मैनुद्दीन पठाण, सुरेंद्र पाटील, प्रा.वसंत मडके, कफील सय्यद, महिला जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, मनिषा वाघमारे, प्रभाकर लोंढे, मिलिंद गोवर्धन, मौलाना शौकत सय्यद, अजहर पठाण, कफील सय्यद, आरेफ मुलानी, अभिमान पेठे, महादेव पेठे, सचिन धाकतोडे, खय्यूम शेख, सौरभ गायकवाड, पृथ्वीराज देडे, अल्ताफ मोमीन, मैनुद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.













