• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे -ओंकार देशमुख

lokmadat news by lokmadat news
November 7, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
25
VIEWS

मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे -ओंकार देशमुख

अनुचित प्रकार रोखण्यासाठी आमची टीम तत्पर – नीता अंधारे

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यासाठी ९४ हजार १४ मतदार संख्या असून या मतदारांनी निर्भयपणे शांतपणे शांततेत व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धाराशिव ओंकार देशमुख व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.७ नोव्हेंबर २०१५ रोजी केले.

धाराशिव नगर परिषद निवडणूक संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, धाराशिव नगर परिषदेत अंतर्गत ४१ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. २० प्रभागापैकी १९ प्रभागामध्ये त्री सदस्य निवडणूक होणार आहे. मतदान करण्यासाठी प्रभागांमध्ये १०० मतदान केंद्र तर प्रभागाबाहेर ८ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांसाठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया दि.१० ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दुपारी ३.३० वाजेपर्यंत रविवार सुट्टीचा दिवस वगळून सुरू राहणार आहे. तर छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून दि.२० ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. तर दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि.२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर दि.३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतदान मोजणी प्रक्रिया होऊन निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मतदान प्रक्रियेसाठी काही अडचण आल्यास आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा ते आपणाशी संपर्क साधून आपणास निवडणूक संदर्भात आवश्यक ती मदत करतील. तर यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा निवडणूक प्रचार व्यवस्थित आहे का नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे १५ उमेदवारांसाठी एक बॅलेट पेपर राहणार असून उमेदवारांची संख्या किती असेल ? या वरती बॅलेट पेपरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील संवेदनशील मतदान भूतांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दिली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे त्या संदर्भात कारवाई केली जाईल असे देशमुख व अंधारे यांनी सांगितले.

या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास निवडणुकीत १५ लाख रुपये तर नगरसेवकास ५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे. तसेच मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड, शासकीय नोकरदार असल्यास शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आदींसह आवश्यक पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे देशमुख व अंधारे यांनी सांगितले.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

Next Post

धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धाराशिवमध्ये "शाहरुख"सारख्या "लाल" गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT