राजकीय द्वेशापोटी खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
प्रभाग क्रमांक २० मधील लोंढे यांचे प्रकरण
धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील जुना बस डेपो परिसरात केवळ राजकीय व्देशापोटी दाखल झालेल्या मारहाण प्रकरणी विलास लोंढे व बिभीषण लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र
न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची बाजू ॲड. विशाल साखरे व ॲड. अजित दानवे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले मुद्दे व वस्तुस्थिती पाहून न्यायाधीशांनी दि.७ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी बचाव पक्षाच्यावतीने वकिलांनी, हा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेला असून, वस्तुस्थिती दडवून आरोपींवर खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेषतः फिर्यादीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असल्याने सदर तक्रारीची पार्श्वभूमी संशयास्पद असल्याचे न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडले. तसेच ॲड. साखरे यांनी विलास लोंढे हे सध्या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० मधून भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकीय हेतूने ही तक्रार दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाजू न्यायाधीशांना पटवून दिली. ॲड. साखरे व ॲड दानवे यांनी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. डी. गायकवाड यांनी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. ॲड साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. संकेत गोरे, ॲड. शुभम तांबे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. उदय आडेकर, ॲड. पृथ्वीराज खोतरे, ॲड. आकाश एडके, ॲड. रोहित लोमटे, ॲड. महेश पवार, ॲड. फतेह अली शेख आणि ॲड. कृष्णा सावंत यांनी सहकार्य केले. लोंढे यांना नाहकपणे अशा प्रकरणात गुंतवण्यात विरोधकांना यश आले असले तरी न्यायदेवतेसमोर सत्याचा विजय झालेला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












