प्रभाग क्रमांक २० मध्ये पुन्हा एकदा सुशिक्षित उमेदवार वंदना बापू पवार आघाडीवर!
जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि विकासाच्या बळावर निवडणूक लढविणार आणि जिंकणार!– वंदना पवार
धाराशिव दि.११(प्रतिनिधी)– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक स्वयंघोषित कार्यकर्त्यांना अचानक “समाजसेवेचा साक्षात्कार” झाला असून काही दिवसांपासून नाले काढणे, रस्ते साफ करणे, दिवे बसवणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे अशा कृत्रिम समाजसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत नागरिकांसाठी खर्या अर्थाने कार्य करणारे प्रतिनिधी मोजकेच आहेत.
या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषद प्रभाग क्रमांक २० मध्ये माजी नगरसेविका वंदना बापू पवार या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वंदना पवार यांनी ५ वर्षे नगरसेविका म्हणून यशस्वी कार्य केले असून, त्या महिला व बालकल्याण सभापती तसेच शिक्षण सभापती पदावरही कार्यरत राहिल्या आहेत. त्यांचा अनुभव आणि शैक्षणिक दृष्टीकोन नागरिकांच्या विकासात मोलाचा ठरला आहे.
वंदना पवार या भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार असून, त्यांचा विकासाचा ठसा प्रभागात ठळकपणे दिसून येत आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते नितीन काळे, तसेच आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागांमध्ये अनेक विकासकामे खेचून आणलेले आहेत.
पूर्वी त्यांचे पती बापू पवार हेही नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले असून, त्यांच्या दोघांचा प्रभागातील नागरिकांशी घट्ट जनसंपर्क आहे. घरकुल योजना, सामाजिक उपक्रम, सार्वजनिक सुविधा, शिक्षणविषयक प्रकल्प या सर्वांत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
स्थानिक पातळीवर वंदना पवार यांच्या जनसंपर्क आणि लोकप्रियतेमुळे विरोधक मात्र गोंधळात सापडले आहेत. त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधकांनी आतापासूनच राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. परंतु जनतेशी असलेली वंदना पवार यांची नाळ, त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास या सर्वामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, प्रभाग क्रमांक २० मध्ये पुन्हा एकदा सुशिक्षित, अनुभवी आणि कार्यक्षम उमेदवार निवडून येण्याची शक्यता बलवत्तर झाली आहे.
प्रभाग क्रमांक २० – वंदना बापू पवार यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक रंगणार रंगतदार!
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












