• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून युवा चेहरा पुढे नेहा राहुल काकडे नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर!

lokmadat news by lokmadat news
November 15, 2025
in राजकारण
0
0
SHARES
164
VIEWS

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून युवा चेहरा पुढे नेहा राहुल काकडे नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर!
ओबीसी महिला राखीव जागेत नेहा काकडे यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता महायुतीत एकमत!
धाराशिव (प्रतिनिधी) :
धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांचे नावे समोर येत आहेत. मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून या प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदासाठी नेहा राहुल काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत प्रबळ मानली जात आहे.
माजी नगरसेवक सुनंदा हरिभाऊ काकडे यांच्या सुनबाई व भारतीय जनता युवा मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष युवा नेते राहुल काकडे यांच्या सौभाग्यवती नेहा काकडे यांचे नाव पक्षात तसेच महायुतीमध्ये चर्चेत असून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव नगरपरिषदेतील भाजपला ही जागा सुटणार असून त्यासाठी काकडे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
नेहा काकडे यांच्या निवडीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. राहुल काकडे यांचा संपूर्ण शहरातील दांडगा जनसंपर्क, नगरसेवकपदाचा अनुभव, प्रभागातील अनेक विकासकामे त्यांची प्रत्येक मतदारांपर्यंत असलेली मजबूत पकड व त्यांच्या वडिलांचा शहरातील औद्योगिक प्रभाव, तसेच त्यांची पक्षावरील एकनिष्ठता आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, महायुतीच्या घटक पक्षांकडूनही नेहा काकडे यांच्या नावाला कोणताही विरोध नाही. उलटपक्षी, जिल्हा आणि शहर पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने धोरणात्मक बैठकांमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे.
मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल काकडे यांची सक्रियता आणि पक्षातील संघटनात्मक कामकाज लक्षात घेऊन पक्षात त्यांच्या कुटुंबावर विश्वास ठेवण्यात आला असल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे नेहा काकडे या भाजपच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
जर भाजपकडून नेहा काकडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले, तर धाराशिव नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एक युवा महिला नगराध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळणार आहे. उर्मिलाताई गजेंद्रगडकर यांच्या नंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्व शहराच्या विकासाची धुरा सांभाळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून नेहा राहुल काकडे यांच्या नावाची घोषणा लवकरच भाजप कार्यालयातून होणार आहे. या घोषणेनंतर धाराशिवमधील राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळण्याची शक्यता आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाची गुप्त रणनीती – नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा!

Related Posts

राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
Next Post

धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाची गुप्त रणनीती – नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

March 4, 2026

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT