प्रभाग 14 मध्ये शौकत शेख यांचे भव्य शक्ती प्रदर्शन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून उमेदवारी अर्ज दाखल!
धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून, आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 (सर्वसाधारण) मधून शौकत भाई शेख यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शौकत शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दाखवलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर पक्ष नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभागातील जनसामान्यांमध्ये असलेला त्यांचा लौकिक आणि नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांची नावे सुरुवातीपासूनच चर्चेत होती.
शौकत शेख हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत, गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य, तरुणांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत, हॉस्पिटल खर्चासाठी मदत अशा विविध माध्यमातून समाजकार्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रभागातील अनेक स्थानिक समस्या त्यांनी स्वखर्चातून सोडवल्याने जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज त्यांनी प्रभागातील कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केला. धाराशिव नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
सतत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या शौकत शेख यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












