• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

महायुतीकडून नेहा काकडे तर महाविकास आघाडीकडून संगीता गुरव दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दाखल!

lokmadat news by lokmadat news
November 18, 2025
in राजकारण
0
0
SHARES
661
VIEWS

लोकमदत न्यूजची भविष्यवाणी खरी ठरली!
महायुतीकडून नेहा काकडे तर महाविकास आघाडीकडून संगीता गुरव; दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दाखल!
धाराशिव दि.१८ नोव्हेंबर (अमजद सय्यद) :धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला होता. कोणत्या पक्षाकडून कोणत्या महिलेला अधिकृत उमेदवारी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 06 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमदत न्यूजने केलेल्या विशेष विश्लेषणात महायुतीकडून भाजपच्या सौ. नेहा राहुल काकडे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या सौ. संगीता सोमनाथ गुरव हे दोन सर्वात प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. सोमवारी दिनांक 17 नोव्हेंबर 2025, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, लोकमदत न्यूजची भविष्यवाणी अचूक ठरली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी याच दोन नावांवर अधिकृत मोहोर उमटवत एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यामुळे पुढील नगराध्यक्षपदावर थेट लढत नेहा काकडे विरुद्ध संगीता गुरव यांच्यात होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून सौ. नेहा राहुल काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव पक्षांतर्गत सर्वाधिक चर्चेत होते. पक्षातील वरिष्ठांची पसंती, कार्यकर्त्यांचा समर्थनाचा ओघ आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मल्हार पाटील यांचे पाठबळ यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.
तर महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या सौ. संगीता सोमनाथ गुरव यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दोन टर्म नगरसेवक राहिलेले आणि सध्या शहरप्रमुख असलेल्या सोमनाथ गुरव यांच्या कार्याचा लाभ त्यांना मिळाला असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांचे पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवारीला मिळाले आहे.
06 ऑक्टोबर रोजी लोकमदत न्यूजने केलेल्या सखोल आणि अचूक विश्लेषणातील दोन्ही प्रमुख दावेदार प्रत्यक्षात अधिकृत उमेदवार म्हणून समोर आल्याने लोकमदत न्यूजच्या वृत्तांकनाला आज अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगर परिषद मुख्याधिकारीनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५नगराध्यक्ष
SendShareTweet
Previous Post

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकडो अर्ज दाखल आज छाननी

Next Post

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्तानेआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन…

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्तानेआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT