“लोकमदत” न्यूज च्या भविष्यवाणी वर अखेर शिक्कामोर्तब…
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 : लोकमदत न्यूजने जाहीर केलेलेच उमेदवार पक्षांकडून अधिकृत
धाराशिव दिनांक१९ (अमजद सय्यद) :धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर होताच शहरात उमेदवारांच्या चर्चांना जोर चढला होता. कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच “लोकमदत” न्यूज ने विश्वसनीय सूत्रांवर आधारित माहिती नागरिकांसमोर आणली होती. आज पक्षांकडून झालेल्या उमेदवारीच्या घोषणांमध्ये लोकमदत न्यूजने जाहीर केलेली सर्व नावे तंतोतंत खरी ठरल्याने चॅनलची अचूकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
लोकमदत न्यूजने पूर्वीच जाहीर केलेली व प्रबळ दावेदार ठरलेली नावे होती — प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय जनता पक्षाकडून वंदना बापू पवार तसेच विलास बापू लोंढे, प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कृष्णा पंडित (आबा) मुंडे, प्रभाग क्रमांक 4 मधून त्याच पक्षाकडून प्रशांत उर्फ बापू साळुंखे, प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून शोएब खालील पठाण, तर प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेस पक्षाकडून उजमा सबा अझहर पठाण. नागरिकांनी ज्या उमेदवारांची नावे लोकमदत न्यूजवर पाहिली व ऐकली, त्याच उमेदवारांना आज पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने लोकमदत न्यूजच्या बातम्यांची विश्वसनीयता अधिक दृढ झाली आहे.
राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अचूक आणि सखोल माहिती देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या “लोकमदत” न्यूजने या निवडणुकीतही आपल्या तपशीलवार वृत्तांकनाद्वारे जनतेचा विश्वास जिंकला आहे. “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” असलेले हे माध्यम निष्पक्ष व जबाबदार पत्रकारितेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. लोकमदत न्यूजचे वृत्त शंभर टक्के खरे ठरल्याने नागरिकांनी लोकमदत न्यूजच्या टीमचे विशेष आभार व्यक्त केले असून आगामी निवडणुकीतील घडामोडींसाठी लोकमदत न्यूजच्याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












