नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करुन दगडफेक
करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार रहिमान सौदागर शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.18.11.2025 रोजी 15.00 वा. सु. नगर परिषद कार्यालय परंडा येथे नामनिर्देशन फॉर्म छाननीच्या ठिकाणी सभागृह येथे व नगर परिषद कार्यालयाचे मुख्य गेटवर परंडा येथे नमुद आरोपींनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लघन करुन निवडणुक कामकाज या मध्ये गोंधळ निर्माण करुन नगर पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर दगडफेक करुन शासकीय मालमत्तेस, स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण केला व मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल बंडु रणदिवे, व्य- नगर अभियंता नगर परिषद कार्यालय परंडा रा. बावची रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.












