भाजपने दिला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय…प्रभाग ६ मधून अभिजित पतंगे तर १६ मधून रॉबिन बगाडे उमेदवार
धाराशिव : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी धनशक्ती, दबाव, राजकीय संपर्क, वारसा, नेत्यांचे लॉबिंग आणि निवडणुकीच्या वेळी अचानक केलेल्या जनसंपर्काच्या खेळामुळे राजकीय वातावरण तापले होते. अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांजवळ पळापळ, शक्कली आणि पैशाचा वापर करून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न केले. पाच वर्षे जनतेपासून दुरावलेले, घरात बसून काम न करणारे, नळ-रस्त्यांपासून दुरुस्तीपर्यंत कुठेच काम नसलेले काही जण निवडणुकीच्या तोंडावर “फक्त आम्हालाच तिकीट” असा हट्ट धरत, पैसे टाकून जनतेचे मत विकत घेण्याचा प्रयत्नही करताना दिसले.
अशा परिस्थितीत या दबावाला बळी न पडता भारतीय जनता पक्षाने पैशाच्या जोरावर येणाऱ्यांना नकार देत सर्वसामान्य घरातील, निष्ठावंत, कार्यकर्तृत्वाच्या जोरावर उभारलेल्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील अभिजित नारायण पतंगे तर प्रभाग क्रमांक १६ मधील रॉबिन कुंडलिक बगाडे यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने कार्यकर्त्यांचा मान राखला आहे.
हा निर्णय आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तसेच युवा नेता मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. नेत्यांनी वशिलेबाजी,लॉबिंग, दबावाला बळी न पडता सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन, “भाजप म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष” असा संदेशच मतदारांना दिला आहे.
अभिजित पतंगे : आंदोलनांतून तयार झालेला कार्यकर्ता
प्रभाग क्र. ६ चे उमेदवार अभिजित नारायण पतंगे हे मागील अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात सक्रिय आहेत. विविध सामाजिक प्रश्नांसाठी उभे राहून त्यांनी अनेक आंदोलनांत नेतृत्व करीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागातील नागरी समस्यांवर सातत्याने काम केले. त्यांच्या जनसंपर्काचे जाळे आणि जनतेशी कायम असलेला संपर्क पाहता पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत उमेदवारी दिली.तर
रॉबिन बगाडे : वारसा नाही पण कार्यकर्तृत्वाची ताकद
प्रभाग १६ मधील उमेदवार रॉबिन कुंडलिक बगाडे यांना कोणताही राजकीय वारसा नाही. ते राजकीय घराण्यातून आलेले नाहीत. मात्र निष्ठा, मेहनत, शिस्त आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी मतदारसंघात मजबूत पकड निर्माण केली. युवा नेतृत्व मल्हार पाटील यांचा विश्वास जिंकत त्यांनी संघटनात्मक कामात सातत्य ठेवले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकासकार्यात सक्रिय सहभाग घेऊन जनतेचा विश्वास कमावला.
पैशाच्या जोरावर येणाऱ्याची बोळवण, कार्यकर्त्याचा मान राखला.भाजपने उमेदवारी देताना पैसा, दबाव, नेत्यांची लॉबी या सगळ्यांना नाकारत कार्यकर्त्यांच्या निष्ठेला प्राधान्य दिले. उमेदवारी मिळवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या वेळी मतदारांशी अचानक जवळीक दाखवणारे, पाच वर्षे गायब असलेले, जनतेपासून तुटलेले, केवळ निवडणुकीत दिसणारे उमेदवारांवर जनतेनेच नाराजी व्यक्त केली आहे.
“मतदान करताना खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच मत द्या. बाहेरून येणारे, पैसा खर्च करणारे आणि निवडणुकीपुरता प्रचार करणाऱ्यांच्या मागे जाऊ नका,” असे आवाहन भाजप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांकडून मतदारांना करण्यात आले.
जनतेचा प्रतिसाद : ‘काम पाहून मतदान करू’
दोन्ही उमेदवारांनी 24 तास उपलब्ध राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा फायदा आता निवडणुकीत दिसत आहे. नागरिकांमध्ये “काम करणाऱ्यांनाच संधी” ही भावना बळकट होत असून सर्वसामान्य घरातील या उमेदवारांच्या पाठीशी नागरिक उभे राहत असल्याचे चित्र प्रभागात पहायला मिळत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












