धाराशिव झिरो पोलिसांच्या मदतीने “बेळ”गाम झालेल्या कर्मचाऱ्याची ‘पिशवी व्यवहार’… रिक्षाचालकाची थेट एसपीकडे तक्रार!
धाराशिव, दि. २६(प्रतिनिधी) :धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोलापूर मार्गावर ताजमहाल टॉकीज परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या कथित आर्थिक व्यवहाराच्या घटनेने संपूर्ण पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आठवडी बाजाराजवळून अवैध दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाला दोन पोलिसांनी अडवल्यानंतर झालेल्या कथित ‘रकमेच्या देवाणघेवाणी’ने आता थेट विभागातील स्वच्छतेवरच सवाल उपस्थित केले आहेत.
आठवडी बाजारातील प्रचंड गर्दीत वाहतुकीचा अडथळा निर्माण करत रिक्षा अडवण्यात आली. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाकडून कथितरीत्या काही रक्कम मागवण्यात आली आणि ती थेट न स्वीकारता केळीच्या गाड्यावर “कॅरीबॅग पिशवीच्या खाली, ठेवण्यास सांगितल्याची खमंग चर्चा शहरात जोरात आहे. हा संपूर्ण प्रकार रिक्षातील प्रवाशाने चित्रीत केल्याची (व्हिडिओ असल्याची) जोर धरत असून त्यात थेट पैसे घेणारा कर्मचारी नसून ‘झिरो कर्मचारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्याच व्यक्तीची भूमिका असल्याचेही सांगितले जात आहे.
सोशल मीडियाच्या युगातील या कथित व्हिडिओची चर्चा आता पोलिस स्टेशनपासून शहरातील चहा पिताना टपरीवर मावा खाताना सगळीकडे चांगलीच रंगली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे,हे संपूर्ण प्रकरण धूसर असले तरी गंभीर स्वरूपाचे असल्याचे जाणवत आहे.
यानंतर आणखी एक महत्त्वाचा विकास घडला. मंगळवारी संबंधित रिक्षाचालकाने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. आर्थिक तडजोड करण्यासाठी संबंधित बेळगाम झालेल्या कर्मचाऱ्यांवर मागील 15 ते 20 दिवसांपूर्वीही अवैध दारू वाहतूक प्रकरणात अशाच पद्धतीच्या कथित आर्थिक तडजोडीचे तक्रार (पुरावे) सादर करून कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपतीसंभाजीनगर यांच्याकडे कारवाईसाठी देण्यात आले होते. परंतु, या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कोण कापणार?’ या म्हणीप्रमाणे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संरक्षण मिळत असल्याची चर्चा मुख्य मुद्दा ठरली असल्याचे देखील सूत्राने सांगितलेआहे.
सूत्रांनी सांगितले की, हे कर्मचारी वरिष्ठांना गोलमाल उत्तरे देत राहतात आणि काही अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांना पाठराखण केल्याने ‘विशेष प्रयत्न’ करणारे हे कर्मचारी अधिक “बेळ”गाम झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.
याच जोडीने ‘झिरो पोलिसांना सोबत घेऊन’ आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतदेखील त्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील गर्दीच्या जागी वाहने अडवून रक्कम गोळा करणे, तसेच अवैध वाहतुकीवर तोडपाणी घेणे अशा प्रकारांच्या खमंग चर्चांनी पोलीस विभागातील विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण केले आहेत.
पण सर्वात महत्वाचा प्रश्न आता पुढे आला आहे —
रविवारच्या घटनेत कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा असतानाही, यावेळी पोलीस अधीक्षक खऱ्या अर्थाने कारवाई करतील का?
की पुन्हा कागदी घोडे नाचवून ‘संरक्षण’च दिले जाईल?
धाराशिव शहरातील सर्वसामान्य जनता, तसेच पोलीस दलातील सचोटीने काम करणारे कर्मचारीही आता फक्त उत्तराची प्रतीक्षा करत आहेत.
ज्या ज्या वेळी अशा घटना सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बातमी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा काही ठाणे प्रभारी अधिकारी पत्रकारांना किंवा तक्रारदारांना अडकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून अडकण्याचा तोंडी आदेश देत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
यामध्ये खंडणी, विनयभंग, ॲट्रॉसिटी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकवण्याचे थेट तोंडी आदेश दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद ताकद
संपादक : अमजद सय्यद 8390088786















