प्रभाग ७ व ८ मध्ये भाजपाची दमदार प्रचारफेरी उमेदवारांना जनसमर्थनाचा प्रचंड उत्साह.. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीप्रदर्शन
धाराशिव – नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मध्ये दमदार राहणारी भव्य प्रचारफेरी काढत वातावरण चांगलेच तापले. या प्रचारफेरीचे नेतृत्व नगरातील लोकप्रिय युवा नेते मल्हार पाटील यांनी केले. या रॅलीस उपस्थित नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत भाजपाच्या उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले.
प्रचारफेरीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे, प्रभाग ७ मधील सौ. आकांक्षा आकाश वाघमारे व अमित दिलीपराव शिंदे, तसेच प्रभाग ८ मधील सौ. किरण ईश्वर इंगळे व युवराज वीरसेन राजेनिंबाळकर यांच्या समर्थनार्थ जनसंपर्क करण्यात आला. गवळी गल्ली, भीमनगर, लिंबोणी बाग आणि तांबरी विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उमेदवारांविषयी सकारात्मकता व्यक्त केली.
प्रचारफेरीची सुरुवात गवळी गल्ली येथील प्रसिद्ध श्री बाल हनुमान गणेश मंडळात गणरायाचे दर्शन घेऊन करण्यात आली. या वेळी मंडळाचे मार्गदर्शक भालचंद्रजी हुच्चे सर यांच्याशी विशेष चर्चा करून प्रेरणादायी मार्गदर्शन प्राप्त झाल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन आणि खंडोबा मंदिराचे दर्शन घेत प्रचारफेरी पुढे सरकली.
मतदानाचा दिवस जवळ येत असताना भाजपाच्या उमेदवारांना मिळणारा लोकसमर्थनाचा ओघ सतत वाढत असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासकार्यातील भक्कम नोंदी आणि शहराच्या प्रगतीची हमी यामुळे पक्षाच्या उमेदवारांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असून आजच्या रॅलीत त्याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रचारफेरीत अमित शिंदे, खंडेराव चौरे, नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, अमरसिंह देशमुख, सगुणाताई आचार्य, शिवानीताई परदेशी, प्रवीण पाठक, बाळासाहेब खांडेकर, दर्शन कोळगे, प्रवीण शिरसाट यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













