धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्र.१ मध्ये अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा!
धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आकाश राम सहाणे यांनी काही तांत्रिक कारणास्तव अर्ज मागे घेता आला नसला तरी धाराशिवच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षच सक्षम आहे या दृढ विश्वासातून आज प्रभागातील भाजप उमेदवार स्वप्निल शिंगाडे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.
सहाणे म्हणाले, “आपल्या प्रभागाचा तसेच संपूर्ण धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली फक्त भाजपच करू शकते,” आणि याच भूमिकेतून त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.
धाराशिवच्या विकासाला साथ देत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांनी सहाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रभागातील प्रत्येक मतदारांना त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्वप्निल शिंगाडे व सौ. सुलभा प्रकाश पवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे यांना आपले बहुमोल मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये येण्याचा कार्यकर्त्यांचा ओढा कायम आहे. आता अपक्ष उमेदवाराने देखील भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजय आणखीन सोपा झाला आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी.नितीन भोसले.राजाभाऊ पाटील.बालाजी गावडे.नाना कदम.प्रकाश पवार.बापू लोंढे.अमित पडवळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.











