विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये भाजपाची ताकद आणखी भक्कम
मुकेश चौघुले यांच्यासह शेकडो युवकांचा आ.पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव दि.३०— धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाला आज मोठी ताकद मिळाली. विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उबाठा गट) चे शाखाप्रमुख मुकेश चौगुले, अक्षय पवार, राहुल जाधव, बालाजी जाधव आणि योगेश देवकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपाच्या बाजूने झुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कार्यकर्त्यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाने सत्कार करून स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेश सोहळ्यात उमेदवार विलास मारुती लोंढे आणि बापू पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्वसमावेशक आणि जनकल्याणकारी कार्यपद्धतीवर दृढ विश्वास व्यक्त करत प्रभाग २० मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे, तसेच प्रभागातील उमेदवार विलास लोंढे आणि पवार यांना विक्रमी बहुमताने विजयी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग २० मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला हा पक्षप्रवेश भाजपासाठी निर्णायक ठरणार असून नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या भक्कम विजयाची चाहूल यामुळे अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













