उद्धारकर्त्या महामानव भीमरायास लेकरांची मानवंदना
समता सैनिक दलाने दिली सलामी
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) – भारतरत्न, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास भीम अनुयायांनी विविध उपक्रमाद्वारे आपल्या उद्धारकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व इतर विविध सामाजिक संघटना तसेच भीम अनुयायांनी कृतिशील उपक्रमांद्वारे दि.६ डिसेंबर रोजी अभिवादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पहाटे १२ वाजल्यापासूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायांनी गर्दी केली. तर सकाळी ९.३० वाजता भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सार्वजनिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तर समता सैनिक दलाच्यावतीने महामानवास सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजश्री कदम, जिल्हा सचिव विजय बनसोडे, बौद्धाचार्य बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे तालुकाध्यक्ष, तालुका अध्यक्ष उमाजी गायकवाड, कोषाध्यक्ष संतोष झेंडे, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव सचिन दीलपाक, स्वराज जानराव, सिध्दार्थ बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, अतुल लष्करे, प्रशांत सोनवणे, विशाल शिंगाडे, प्रसेना प्रतिष्ठानचे संदीप बनसोडे, पुष्पकांत माळाळे, धनंजय शिंगाडे, शिवसेना धाराशिव शहर प्रमुख सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, धम्मपाल शिंगाडे, प्रशांत पांडागळे, सौरभ शिंगाडे, संदीप बनसोडे, सुधीर वाघमारे, काटे, प्रतीक चंदनशिवे, मारुती पवार, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक वही, एक पेन देऊन अभिवादन
बहुजन विद्यार्थी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक वही, एक पेन अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या उपक्रमास भीम अनुयायांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष स्वराज जानराव, भैय्यासाहेब नागटिळक, मृत्युंजय बनसोडे, प्रवीण बनसोडे, पृथ्वीराज चव्हाण, अक्षय जोगदंड, संदीप बनसोडे, स्वप्नील शिंगाडे, सतीश बनसोडे, शितल चव्हाण, महादेव भोसले, संजय थोरात, आकाश जानराव, सचिन दिलपाक, अतुल लष्करे आदी उपस्थित होते.
प्रसेना प्रतिष्ठानची सलग १७ व्या वर्षी रक्तदानाने मानवंदना
प्रज्ञासुर्य महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व प्रसेना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाहू फुले आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत रक्तदान शिबिरात ७५ दात्याने रक्तदान करून महामानवास अभिवादन केले. यावेळी प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रज्योत बनसोडे, नागराज साबळे, मैनुद्दीन पठाण, संदीप गायकवाड, कुमार ओहाळ, रिया गायकवाड, नंदिनी माळे, निखिल बनसोडे, दादासाहेब मोरे, अमोल बनसोडे, शैलेंद्र शिंगाडे, राजेश माळाळे, स्वप्निल बनसोडे, दिलीप गंभीरे आदींसह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ विवेक कोळगे, डॉ दीपमाला कारंडे, टेक्निकल सुपरवायझर विठ्ठल कांबळे, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंके, टेक्निशियन दीप्ती बंगले, सहाय्यक रविराज गंभीरे आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे काम केले.
समरसत्ता मंचची रक्तदानाने मानवंदना
सामाजिक समरसत्ता मंचची रक्तदानाने मानवंदना
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केसरिया प्रतिष्ठान व सामाजिक समरसत्ता मंच धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात २३ दात्याने रक्तदान करून महामानवास अभिवादन केले.
धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आयोजित रक्तदान शिबिरास समरसता मंचाचे जिल्हा संयोजक ॲड सचिन सुर्यवंशी, ॲड कृष्णा मसलेकर, गतविधी विभाग मंडळ सदस्य तुकाराम डोलारे, प्रशासकीय अधिकारी संपर्क प्रमुख राजेंद्र कापसे, यशवंत शहापालक, विश्वास कांबळे, डॉ हर्षल डंबळ तर सोलापूर येथील डॉ हेगडेवार रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ आनंद वैद्य, जनसंपर्क अधिकारी रविकुमार कोटा, अनुजा शिंदे, सौख्या देसाई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.















