धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
धाराशिव दि.09(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील साई कला केंद्रात काम करणाऱ्या महिलेसोबत (नृत्यांगन) असलेल्या प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराखळी परिसरात घडलेल्या या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अश्रुबा अंकुश कांबळे (वय ३९ वर्षे राहणार रुई,ढोकी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, मृतक अंकुश कांबळे व त्याची मैत्रीण जी पुर्वी साई कला केंद्रात नृत्य काम करत होती, तेव्हा पासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले असून सध्या ती महिला बार्शी तालुक्यातील शेंदरी येथील “कमल कला केंद्र” येथे काम करत असल्याची माहिती मिळाली असून हे दोघे शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समजते.
दरम्यान, प्रियकराच्या विवाहित बायकोचा आलेल्या फोनवरून मोठा वाद निर्माण झाला. वादाच्या भरात “आत्महत्या करतो” अशी धमकीही मृतकाने दिली होती. मात्र प्रियसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा चोराखळी येथे तरुणाने गळफास घेऊन जीव दिला.
येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र मागील काही महिन्यांपासून वाद व गैरप्रकारांच्या चर्चेत सतत राहिले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका उपसरपंच बर्गे यांनी कला केंद्रातील महिलेच्या नादी लागून आत्महत्या केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ‘कला केंद्र’ हा वादाचा आणि बेकायदेशीर संबंधांचा केंद्रबिंदू ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
कलाकेंद्र मधील महिला येरमाळा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून पुढील सुरू असून, या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा कलाकेंद्र चर्चेत आले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












