मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड
धाराशिव –
धाराशिव शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची हॉटेल रोमा येथे दि.१० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि जनसहभागातून साजरा होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेली ३६ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ठसा उमटवणारा हा महोत्सव यावर्षी नव्या उपक्रमांनी समृद्ध करण्याचे संकेतही बैठकीतून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना पदाधिकाऱ्यांनी नमूद केले केले
धैर्य, शौर्य व दूरदृष्टीचे तेजस्वी प्रतीक,
न्याय, समानता व स्वाभिमानाचे अधिष्ठान उभारणारे जननायक,
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे अद्वितीय नेतृत्व,
आणि जनकल्याणाला सर्वोच्च मानणारा प्रेरणास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
या प्रेरणादायी मूल्यांना अधोरेखित करणारे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि समाजजागृतीपर कार्यक्रम आकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवून शिवजयंतीला अधिक अर्थपूर्ण आणि स्मरणीय स्वरूप देण्याचे नियोजन समितीकडून करण्यात येत आहे.
यावेळी समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप,विश्वास शिंदे,भारत कोकाटे, जयंत पाटील,बाळासाहेब शिंदे,दत्ता बंडगर,नाना निंबाळकर,अमित शिंदे,अनंत उंबरे,भारत इंगळे, मसूद शेख ,खलिफा कुरेशी , नादेर हुसेनी ,सय्यद खलील सर,प्रदिप साळुंके,चंद्रकांत मुंडे, मिलिंदराव कोकाटे,शमी मशायक यांचे सह समितीचे सर्व पदाधिकार माजी अध्यक्ष शिवप्रेमी उपस्थीत होते .












