मकोकाचा इशारा कागदावरच? धाराशिवमध्ये “शाहरुख” सारख्या दिसणाऱ्या “लाल” जोडीचा गुटखा धंदा पोलिसांच्या हातावर तुरी!” देऊन राजरोस सुरूच…
धाराशिव दि.१८(प्रतिनिधी):राज्यात गुटखाबंदी असतानाही शाळा, महाविद्यालय परिसरासह अनेक ठिकाणी गुटखा सर्रास आढळत असल्याने शासनाने आता गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर थेट मकोका (MCOCA) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर दुरुस्त्या करण्यात येणार असून येत्या नव्या वर्षापासून गुटखा माफियांवर मकोका लागू केला जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडत, “हार्म आणि हर्ट” या तरतुदींचा अडसर दूर करून गुटखा व्यवसायालाही मकोकाच्या कक्षेत आणले जाईल, असे जाहीर केले होते.
मात्र शासनाच्या या कठोर भूमिकेला धाराशिव जिल्ह्यात हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. येथे पोलीस प्रशासन केवळ किरकोळ टपरी चालक, छोटे दुकानदार यांच्यावर कारवाई करताना दिसत असले तरी गुटख्याचा मोठा खेळ करणारे मुख्य म्होरके आजतागायत पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाहीत. विशेष म्हणजे नळदुर्गजवळील अणदुर परिसरातील “शाहरुख” सारख्या दिसणाऱ्या “लाल” गोड जोडी अशी ओळख असलेली कुख्यात जोडी दोन ते तीन आलिशान वाहनांमधून नळदुर्ग–तुळजापूर–बेंबळी मार्गे धाराशिवमध्ये राजरोसपणे लाखो रुपयांचे गुटख्याची वाहतूक व विक्री करत असल्याचे उघड गुपित आहे.
लाखो रुपयांच्या आलिशान गाड्यांतून दररोज लाखो रुपयांचा गुटखा विकून ही जोडी धाराशिवसह इतर जिल्ह्यांमध्येही बाजारपेठ काबीज करत असल्याचे देखील समोर येत आहे. त्यांचे मुख्य ठिकाण धाराशिव जिल्ह्यातच असतानाही आजपर्यंत त्यांच्यावर एकही ठोस गुन्हा दाखल झालेला नाही, हेच सर्वात गंभीर आणि संशयास्पद आहे. शासन कितीही कठोर कायदे आणो, मकोकाच्या घोषणा करो, पण स्थानिक पातळीवर अंमलबजावणीच होत नसेल तर हे कायदे कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी विशेष पथक नेमून या “शाहरुख” सारख्या दिसणाऱ्या “लाल” जोडीच्या मुसक्या आवळल्या, तरच मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशांची खरी अंमलबजावणी होत असल्याचे सिद्ध होईल. अन्यथा, “मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवर कारवाई” हा दुजाभाव कायम असल्याची भावना अधिक तीव्र होणार, असे बोलले जात आहे. क्रमशः
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












