मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली पालकमंत्री सरनाईक यांची सदिच्छा भेट
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिकांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ८ पैकी ८ नगर पालिकांवर भाजपा–शिवसेना महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि महायुतीच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा ठोस कौल आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी इतर विषयांवर चर्चा केली.












