धाराशिव शहरात साकारणार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक! आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून दत्ता पेठे यांनी केला पाठपुरावा
पुतळ्यासाठी दीड कोटी निधीही मंजूर
समाज बांधवामध्ये आनंदाचे वातावरण
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा साकारण्यात यावा यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वप्रथम नगरसेविका सिंधुताई पेठे यांनी २०११ ला नगर परिषदेमध्ये ठराव मांडून तो मंजूर करून घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक काम केले. २०११ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय दूध डेअरीच्या एक एकर जागेमध्ये उभारण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ती जागा विनामूल्य दिली असून यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून ५० लाख रुपये व नगर विकास विभागाच्यावतीने सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आ राणाजगजितसिह पाटील यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यासाठी दत्ता पेठे यानी सातत्याने व अखंडपणे प्रयत्न केले.
धाराशिव शहरात अण्णाभाऊ साठे चौक येथील नियोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक जागेमध्ये पुतळा उभा करण्यात यावा यासाठी तत्कालीन नगरसेविका सिंधुताई पेठे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात ठराव क्रमांक २२२ मांडला. त्या ठरावास सभागृहांने एक मताने मंजुरी दिली. त्या ठरावाच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यासाठी दि.३० जुलै २०१२ ला कार्यकारी अभियंता, पोलीस अधीक्षक व नगर विकास विभागाचे सचिव यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली. त्यानुसार दि.१२ डिसेंबर २०१५ ला महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्रमांक आरओडी/१०९९/२६५८७ (३०९/९९) रस्ते-४ दि.४/२/२००४ च्या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर, पथ किनारावरती क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची मनाई केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा पुतळा उभारल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आ राणाजगजितसिंह पाटील यांनी लो अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागे लगत असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेत बसविण्यासाठी समाज बांधवांच्यावतीने मागणी करावी अशा सूचना दत्ता पेठे यांना दिल्या. त्या सूचनेनुसार दत्ता पेठे यांच्या अध्यक्षतेखाली समाज बांधवांची २०१८ ला बैठक घेऊन एक एकर जागा मिळावी असा एक मताने ठराव मंजूर केला. तसेच पुतळ्यासाठी दूध डेअरीची जागा देण्यात यावी अशी मागणी दि.४ जून २०१८ ला मुख्याधिकारी यांच्याकडे समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या दरम्यान समाजाच्यावतीने या पुतळा करण्यात यावा या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. त्यामुळे नगर परिषदेने दि.११ जून २०१८ ला ठराव क्र.६ सर्वसाधारण सभेत बहुमताने दूध डेअरीची एक एकर जागा देण्याचा ठराव मंजूर केला. या ठरावानंतर दि.१७ जानेवारी २०२० ला मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना समाज बांधवांच्यावतीने निवेदन देण्यात आले. दि.२४ जानेवारी २०२० रोजी मुख्याधिकाऱ्यांनी जावक क्र.३२१/२०२० नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे दूध डेअरीची जागा नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठविला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दि.८ मार्च २०२३ ला छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, दुग्ध विकास व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनी तो प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी दुग्ध विकास व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांकडे दि.२२ मे २०२४ रोजी त्याच मागणीचा प्रस्ताव पाठविला. तर आ राणाजगजितसिंह पाटील यांनी तत्कालीन दुग्ध विकास व पशुसंवर्धन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी दत्ता पेठे, सुमित क्षीरसागर, संतोष मोरे, संतोष पेठे व विद्या माने या शिष्टमंडळा समवेत प्रत्यक्ष भेटून मागणीचे पत्र देऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर शासनाने दूध डेअरीची जागा पुतळ्यासाठी वर्ग करण्यात यावी असा दि.१ ऑगस्ट २०२४ ला शासन निर्णय दिला. तर दि.७ ऑक्टोबर २०२४ रोजी जागेचे मूल्यांकन २ कोटी ८ लाख रुपये निश्चित करण्यात आले. ती रक्कम संबंधित यंत्रणेकडून भरून घेण्यात यावी असे पत्र नगर परिषदेला दिले. तसेच ती जागा वनीकरण विभागाची आहे किंवा नाही ? याची पाहणी करण्याचे पत्र वन विभागास पाठवले. त्यानुसार वनीकरण विभागाने दि.३१ मार्च २०२५ ला नगर परिषदेला ना हरकत प्रमाणपत्र दिले. पोलीस विभागाचे नाहरकत घेऊन त्यानंतर नगर परिषदेने सदरील मूल्यांकन रक्कम भरू शकत नसल्याचे पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१९ जून २०२५ ला विभागीय आयुक्त महसूल यांना सदरील रक्कम नगर परिषद भरू शकत नसल्याने ती जागा विनामूल्य देण्याची मागणी केली. तसेच आ राणा पाटील यांनी दि.२३ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून ती जागा विनामूल्य देण्याची विनंती केली. त्यानुसार दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती जागा विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाक्रुती पुतळा व स्मारक उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. तो पुतळा भव्य स्वरूपात उभारणार असून समाज बांधवांचे स्वप्न वास्तवात साकारणार आहे. मात्र, पुतळा साकारण्यासाठी दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या सभागृहापासून रस्त्यावरील आंदोलने ते मंत्रालयातील सर्व प्रकारचे पत्र व्यवहार, मंत्र्यांना भेटणे व सातत्याने पाठपुरावा करण्यासह अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या लढाईत अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या पुतळ्या उभारणी मागे खरे योगदान हे आ राणा दादा व दत्ता पेठे यांच्यासह सर्व समाज बाधव यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपादक अमजद सय्यद 8390088786
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद















