धाराशिव दि.१८(प्रतिनिधी):डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव येथील आर. पी. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. अजहर हुसेन शेख यांना जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या फार्मसी शाखेतून पीएचडी प्रदान करण्यात आली.
प्रा. शेख यांनी “Screening of Various Googles for its Multi-Pharmacological Effects in Diabetic Pathology” या विषयावर संशोधन केले असून त्यांच्या या शोधनिबंधाचे अनेक संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनासाठी त्यांना जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाचे डायरेक्टर डॉ. शुभ्रांशू पांडा यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. शेख यांच्या या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












