धाराशिव जिल्ह्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत विक्रमी यश…माजी आ. ठाकूर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद अध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याच्या राजकारणात इतिहास रचला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष पदे जिंकत तसेच विक्रमी संख्येने नगरसेवक विजयी करत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते व धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा यथोचित सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी आमदार ठाकूर यांनी या विजयाचे श्रेय संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमांना, प्रभावी नियोजनाला आणि जनतेच्या विश्वासाला दिले.
ते म्हणाले की, “भाजपाच्या विकासनिष्ठ धोरणांवर आणि नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला मिळालेले हे यश आगामी काळात विकासाला अधिक गती देणारे ठरेल.”
या सत्कार सोहळ्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, देवा नायकल यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करत हा विजय जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड असल्याचे मत व्यक्त केले.
या विजयामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून येणाऱ्या काळात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












