पदग्रहणानंतर पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात – नगरसेवक इंद्रजीत देवकते यांचा झपाटलेला कार्यप्रारंभ
धाराशिव, दि. २९ डिसेंबर २०२५ (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून निकाल जाहीर होऊन तब्बल आठ दिवस झाले आहेत. आज बुधवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी नगराध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
या पदग्रहण सोहळ्यानंतर प्रभाग क्रमांक २० मधून भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक इंद्रजीत देवकते यांनी कोणताही वेळ न दवडता आपल्या प्रभागातील नागरी कामांना प्राधान्य देण्यास तात्काळ सुरुवात केली.
धाराशिव नगरपालिकेमध्ये विविध नागरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची त्यांनी जागेवरच निवेदने स्वीकारली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रत्येक तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व प्रकाशव्यवस्था यांसारख्या प्रश्नांवर तात्काळ लक्ष देण्यात आले.
नगरसेवक देवकते यांच्या या सक्रिय व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे शहरभर कौतुक होत असून, “निवडणूक जिंकल्यानंतरही जनतेसाठी काम करण्याची हीच खरी सुरुवात” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
पुढील पाच वर्षे नगरसेवकांनी अशीच प्रामाणिक, तत्पर व पारदर्शक कार्यशैली कायम ठेवून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा व मागणीही आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













