पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलिसांनी केले रक्तदान
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) – पोलीस दिनानिमित्त शहरातील आनंद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३५ पोलिसांनी दि.२ जानेवारी रोजी रक्तदान केले.
हिवाळ्याचे दिवस असून रक्ताचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे ब्लड बँकेमध्ये देखील रक्त साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असल्याने त्यांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. रक्त साठ्यात होणाऱ्या कमी प्रमाणाची जाण व भान ठेवून आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्त संकलनाचे काम रेणुका ब्लड बँकेचे रक्त संक्रमण अधिकारी, टेक्निकल सुपरवायझर तथा संचालक संजय शिंदे, मनोज इंगळे, नागेश दराडे, टेक्निशियन दुर्गा गरड, सुमित मुठाळ, सफा तांबोळी, मिसबा काझी, स्वाती काळे यांनी पाहिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव, राम घाडगे, परमेश्वर सोगे आदींसह महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.













