युवा नगरसेवक विलास बापू लोंढे यांचा वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान — भरघोस विजयाच्या कार्यकर्त्याला नेतृत्वाकडून मानाचा मुजरा
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शहरात सर्वाधिक मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवणारे नवनिर्वाचित युवा नगरसेवक विलास बापू लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगी सामान्य कार्यकर्त्याला सन्मान देणाऱ्या आमदार पाटील यांच्या नेतृत्वशैलीचे कौतुक सर्वत्र होत असून, हा सत्कार शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
या सत्कारप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विलास लोंढे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि जनतेशी असलेल्या नात्याचे विशेष कौतुक केले. “तरुण नेतृत्वाच्या रूपाने लोंढे यांनी शहराच्या विकासासाठी नव्या आशा निर्माण केल्या आहेत,” असे गौरवोद्गार आमदारांनी यावेळी काढले.
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी नगरसेवक बापू पवार तसेच इतर मान्यवरांनीही लोंढे यांना शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांनी त्यांच्या भावी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सत्काराला उत्तर देताना नगरसेवक विलास बापू लोंढे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. “सामान्य कार्यकर्त्याला इतका मोठा सन्मान देणारे नेतृत्व लाभणे हे माझे भाग्य आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












