• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

lokmadat news by lokmadat news
January 12, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
302
VIEWS

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – येथील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांचा उरुस सुरू आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. उरूस संपला असला तरी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी करमणुकीची साधने असलेल्या विविध प्रकारच्या पाळणा व करमणूक व्यावसायिकांनी आपल्या नियमित तिकिट दरामध्ये थोडी थोडकी नव्हे तर चक्क ३० टक्क्यांची घसघशीत कपात केली आहे. त्यामुळे अनेकजण या करमणुकीच्या साधनाचा देखील मनमुराद आनंद घेत आहेत.

धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांच्या उरूसाला मोठ्या भक्तिमय वातावरणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थितीत व संदल मिरवणुकीने परंपरेनुसार प्रारंभ झाला. हा दर्गाह भारतातील तीन नंबरचा प्रसिद्ध दर्गाह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविक देशाच्या विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी न चुकता येऊन आपली हजेरी लावतात.‌ या उरूस दरम्यान धार्मिक कार्यक्रमाबरोबरच पाळणे व इतर मनोरंजन खेळ आणि विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीचे वेगवेगळे स्टॉल्स देखील लावले जातात. तसेच खवय्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रांतातील मात्र स्वादिष्ट, चविष्ट आणि रुचकर अशा प्रकारची मेजवानी या ठिकाणी दुकानदारांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली असते. पवित्र उर्स दरम्यान विविध जाती-धर्माच्या मानकर यांना मान देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे नागरिक हा उरूस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. उरुस दरम्यान बहारदार कव्वाली गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. नुकताच हा उरूस संपलेला आहे. मात्र, भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असून आणखी तीन – चार दिवस या ठिकाणी हा भाविकांचा ओघ कायम राहणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन sarw पाळणा व इतर मनोरंजन करण्यासाठी आलेल्या दुकानदारांनी त्यांच्या नियमित तिकीट दरामध्ये  ३० टक्क्यांनी कपात केलेली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

Next Post

धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

March 5, 2026

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT