धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) – तुळजापूर पोलीस ठाण्यांतर्गत खंडणी प्रकरणातील पत्रकार सुनील ढेपे यांच्या विरुद्ध नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील प्रकरणात ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून दि.१२ जानेवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तुळजापूर येथील न्यायालयात ढेपे यांच्यावतीने जामीन अर्जावर ॲड. विशाल साखरे यांनी केलेला प्रखर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्यांचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात न्यायालयीन रिमांड स्टेजला संघर्षपूर्ण युक्तिवाद
प्रथम हजर केलेल्या रिमांड वेळेस पोलिसांनी १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू ॲड साखरे यांच्या युक्तिवादामुळे पोलिसांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर हजर केल्यानंतर रिमांड वेळेस पुन्हा पोलिसांनी १० दिवसांची कोठडी मागितली. त्यावेळी देखील ॲड. साखरे यांनी प्रखर बाजू मांडून वास्तविक पोलीस अधिकारी हे अवास्तव पोलीस कोठडी मागत आहेत. पोलीस कोठडीसाठी नमूद करणे संयुक्तिक नसल्याचा युक्तिवाद सादर केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलीस प्रशासनास अवास्तव आणि योग्य कारण मिमांसा स्पष्ट करणे कोठडीसाठी गरजेचे असल्याचे सरकारी वकील व पोलिसांना चांगलेच सुनावले. तर १० दिवसांची पोलीस कोठडी कशासाठी ? असा प्रश्न विचारीत सरकारी वकील व पोलिसांना धारेवर धरले होते. त्यामुळे फक्त एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. यावेळी
ॲड साखरे यांनी खंडणी मागणीत कोणतेही तथ्य नाही. एका तिऱ्हाईत व्यक्तीने तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर फिर्यादीच्या सांगण्यावरून खंडणीचे ५ हजार रुपये रक्कम दिल्याचा आरोप खोटा असल्याचा युक्तिवाद केला. तसेच सर्वोच न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे दाखले देत ॲड. साखरे यांनी ढेपे यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. तसेच राजकीय हेतूने व ड्रग्स प्रकरणाच्या बातम्या केल्यामू त्यांच्यावर द्वेश भावनेने वरील गुन्हा नोंदवला असल्याचा युक्तिवाद देखील ॲड साखरे यांनी केले. साखरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ढेपे यांची जामीनावर मुक्तता केली. या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. विराज जगदाळे (विशेष सहकार्य), ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड, अर्चना कांबळे, ॲड, संकेत गोरे, ॲड ओंकार कोरेगावकर, ॲड, अमित गोळे, ॲड, लक्ष्मीकांत कुलकर्णी, रोहित लोमटे, महेश पवार यांनी सहकार्य केले.












